खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील युनिलिव्हर कंपनीचा ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची बाब समोर आली आहे. ट्रकमधून सर्फ एक्सेलची ७,६३२ पाकिटे गायब झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी सिकंदर उमर पठाण याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २ ते ४ ऑगस्ट याकालावधीत वाळवा तालुक्यातील लक्ष्मीनगर महादेववाडी पेठ येथे घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. हा गुन्हा सांगली जिल्ह्यात घडला असल्याने ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.









