Friday, November 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लवेल येथून विवाहितेचे अपहरण

लवेल येथून विवाहितेचे अपहरण

खेड:- माहेरी जाण्यासाठी लवेल पेट्रोलपंप एसटी बस थांब्यावरून बसमध्ये एकटीच बसून निघालेली २३ वर्षीय विवाहिता माहेरी न पोहोचल्याने बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. प्रणाली आदर्श गमरे (वय २३, रा. लवेल, बौद्धवाडी, ता. खेड) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत पती आदर्श संदीप गमरे (२४) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रणाली गमरे या लवेल पेट्रोलपंप येथील एसटी बसथांब्यावरून बसमध्ये बसून एकट्याच माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांचे माहेर महाड येथील गांधारपाले (जि. रायगड) येथे आहे. मात्र त्या माहेरी पोहोचल्या नसल्याचे समजताच पतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करत आदर्श गमरे यांनी ३ नोव्हेंबर रोजी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल आहे.