Thursday, August 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रिळ येथे चोरट्या दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रिळ येथे चोरट्या दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- तालुक्यातील रिळ-भंडारवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरटी गावठी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत १ हजार ५१० रुपयांची १४ लिटर दारु जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल सुभाष गुरव ( वय ३८, रा. रिळ-गुरववाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना चोरटी गावठी दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार योगेश शेट्ये यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.