Thursday, June 11, 2026
spot_img
Home राजापूर राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ‘इको’ वर कारवाई

राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ‘इको’ वर कारवाई

चालकावर गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका चालकावर कारवाई केली आहे. ही घटना शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जवाहर चौक ते जकात नाका या वर्दळीच्या मार्गावर घडली.

राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शंकर भेडसे हे कर्तव्यावर असताना त्यांना जवाहर चौक ते जकात नाका रोडवर एक ग्रे रंगाची ‘मारुती सुझुकी इको ५ स्टार’ कार (क्रमांक GA 07 K 8659) बेजबाबदारपणे उभी असल्याचे आढळले. आरोपी चालक चंद्रकांत बाळू राठोड (वय २७, मूळ रा. विजापूर-कर्नाटक, सध्या रा. नर्मदा निवास, राजापूर) याने आपली गाडी सार्वजनिक रस्त्यावर अशा ठिकाणी उभी केली होती, ज्यामुळे इतर वाहनांना येण्या-जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. या प्रकारामुळे पादचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने गाडीचा पंचनामा केला आणि चालकाला ताब्यात घेतले.

भररस्त्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी दुपारी १ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी चंद्रकांत राठोड याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.