Wednesday, September 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी सुभाष रोडवरून विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी सुभाष रोडवरून विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातल्या सुभाष रोडवरील श्रीराम टॉकीज समोरील भागातून एका ४३ वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. आरती शिवाजी मोरस्कर (वय ४३, रा. श्रीराम टॉकीज समोर, सुभाष रोड, रत्नागिरी) असे अपहरित महिलेचे नाव आहे. २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या राहत्या घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना अज्ञात कारणावरून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.

या प्रकरणी फिर्यादी श्री. शिवाजी मारुती मोरस्कर (वय ५०, रा. सुभाष रोड, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी पहाटे १२:५६ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गु.र.नं. ३७६/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.