Sunday, September 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला

रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला

अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या बस पार्किंग आवारातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत नंदकुमार सर्वे (वय २६, रा. सर्वेवठार, रणपार, पो. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत सर्वे यांनी त्यांची लाल व काळ्या रंगाची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल (क्र. एमएच-०८-एएस-९६१०) रत्नागिरी एसटी स्थानकाच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर ते कामासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत व संमतीशिवाय ती गाडी चोरून नेली.
फिर्यादीने रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गाडीचा स्वतः काफी शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अखेर खात्री पटल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार नोंदवली.

​रत्नागिरी एसटी स्थानक परिसरासारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळी वाहने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.