खेड:- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे पी. ए.
असल्याचे भासवून चिपळूण तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रवीराज चिखले (रा. खेड) याला येथील पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आपण मंत्री योगेश कदम यांचे पी.ए. असल्याचे खोटे भासवत भेट घडवून आणण्याच्या व काम करून देण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपयांची रक्कम विद्याधर दत्ताराम साळुंखे (बोरगाव-चिपळूण, सध्या मुंबई) यांच्याकडून उकळली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरेंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.









