रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवाहित महिलेचे अपहरण झाल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास शहराजवळील जाकीमिऱ्या-अलावा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी योगेश भिकाजी तांडेल (वय ५१, रा. जाकीमिऱ्या अलावा, तळेकरवाडी, रत्नागिरी) यांची पत्नी सौ. श्रावणी योगेश तांडेल (वय ३८) या रविवारी दुपारी घरातू बाहेर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा शोध घेऊनही त्या मिळून आल्या नाहीत. या प्रकरणी पती योगेश यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









