Wednesday, September 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रोनित निवास भोंगले (वय ३२, रा. पंधरमाड, मुरुगवाडा, ता.जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला हा प्रकार सुरू होता. आरोपी रोनित भोंगले हा स्वतःच्या ता्यात मेन मुंबई मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम बाळगून विनापरवाना मटका जुगार खेळ खेळवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमित राघु पालवे (पोकों/४८४) यांनी घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १५१० रुपयांची रोकड आणि इतर जुगार साहित्य असा एकूण १५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.