रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर-चंपक मैदान येथे विदेशी दारु बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर पर्शुराम पात्रे (वय ३०, रा. पांडवनगर नाचणे, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास उद्यमनगर-चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धेश्वर पात्रे यांच्याकडे मद्यपान करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी विदेशी दारुची बाटली स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील तेरवणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









