Thursday, July 30, 2026
spot_img
Home चिपळूण भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत स्वार गंभीर जखमी

भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत स्वार गंभीर जखमी

डेरवण फाट्यावर अपघात; आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील डेरवण फाटा येथे भरधाव आयशर टेम्पोने ॲक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्कूटरचालक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता डेरवण फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. याप्रकरणी २७ जुलै रोजी रात्री ७.२६ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. फिर्यादी निता रोहित गमरे (मपोहेकॉ/४५५, सावर्डे पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी चालक मनोज लालधारी चौहान (वय ४४, रा. बेलवा, जौनपूर, उत्तर प्रदेश) हा त्याचा ताब्यातील आयशर टेम्पो (क्रमांक: MH-48 -BC -6712) मुंबई-गोवा महामार्गावरून चालवून नेत होता.

आरोपी चालकाने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, तसेच चौक आणि झेब्रा क्रॉसिंगची जागा असतानाही आपल्या वाहनाचा वेग कमी केला नाही. वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवून महामार्ग क्रॉस करणाऱ्या ॲक्टिव्हा स्कूटरला (क्रमांक: MH-08-AZ-5365) जोरदार धडक दिली. यामुळे हा अपघात झाला असून, यात स्कूटरचे नुकसान झाले आहे. या अपघातात शंकर बाबुराव पाटील (वय ५४, रा. क्लासिक अपार्टमेन्ट, वहाळफाटा, ता. चिपळूण) हे अपघातात जखमी झाले आहेत.

आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, सावर्डे पोलीस पुढील तपास करत आहेत.