Thursday, July 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पैसे न दिल्याच्या रागातून वृध्देचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न

पैसे न दिल्याच्या रागातून वृध्देचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न

चिपळूण:- तालुक्यातील निवळी लाखणवाडी येथे पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या रागातून एका ७२ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास निवळी लाखणवाडी येथील फिर्यादी जयश्री पांडुरंग गायकवाड (वय ७२) यांच्या राहत्या घरी घडली. आरोपी ओंकार राजेंद्र लाखण (मुन्ना), रा. निवळी लाखणवाडी, ता. चिपळूण, हा हातात दोरी घेऊन जयश्री गायकवाड यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.

यावेळी आरोपीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्याने आरोपीला राग आला. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या दोरीने त्यांच्या गळ्यात मागून फास टाकून गळा आवळला आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद सावर्डे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या घटनेत जयश्री गायकवाड जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९ आणि ३३३ अंतर्गत आरोपी ओंकार लाखण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावर्डे पोलिस करत आहेत.