Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे तीन गाड्या पेटवल्या; परिसरात भीतीचे वातावरण

पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे तीन गाड्या पेटवल्या; परिसरात भीतीचे वातावरण

रत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे शुक्रवारी पहाटे तीन गाड्या जाळण्यात आल्या. अज्ञात माथेफिरू कडून हा प्रकार करण्यात आला. यात तिन्ही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या असून या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली.

शुक्रवारी पहाटे साडेबारा ते साडेचार या दरम्यान तीन गाड्या जाळण्यात आल्या. बुलेट, एक्टिवा आणि ऍक्सेस या तीन गाड्या पहाटे पेटवून देण्यात आल्या. गाड्यांना लागलेली आग विझविण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र, काही मिनिटातच तिन्ही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा पूर्ण केला. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. मात्र या तीन गाड्या का जाळण्यात आल्या याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. गाड्या जाळणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिस अधीक्षक यांनी व्यक्त केला.