Friday, October 23, 2026
spot_img
Home खेड पन्हाळजे खाडीत बुडून वृद्धाचा मृत्यू

पन्हाळजे खाडीत बुडून वृद्धाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील पन्हाळजे येथे खाडीच्या पाण्यात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हरी मेढेकर (वय ५७, व्यवसाय- शेळीपालन, रा. पन्हाळजे भोईवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नीच्या निधनानंतर किशोर मेढेकर हे मानसिक तणावाखाली होते. तसेच ते कोणाशीही जास्त बोलत नव्हते.

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या पूर्वी पन्हाळजे दर्गा जेटी येथील खाडीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.