Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा निवसर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

निवसर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

लांजा:- तालुक्यातील निवसर धावडेवाडी येथील ५० वर्षीय संतोष रामचंद्र धाडवे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ते उपचारासाठी चांदेराई येथील सरकारी दवाखान्यात जात होते, मात्र दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते सडा धावडेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला पडलेले आढळले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ३ वाजून ५० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.

संतोष धाडवे हे ०३ मे २०२५ रोजी चांदेराई येथील दवाखान्यात उपचारासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दुपारी दोनच्या सुमारास ते सडा धावडेवाडी येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.