रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडी बोरवेल ते समाज मंदिर जाणारा रस्त्यात दगड टाकून अडवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुर्वी कोणीतरी अज्ञाताने बौद्धवाडी बोरवेल ते समाजमंदिर फिर्यादी जितेंद्र जयवंत सावंत (वय ३३, निवळी बौद्धवाडी ता. रत्नागिरी) यांच्या येण्या-जाण्याच्या रस्ता अडविला होता. तो पोलिसांनी पंचनामा करुन मोकळा केला होता. रस्त्यात टाकलेले चिरे बाजूला केले होते. पुन्हा बौद्धवाडी ते समाजमंदिर जाणारा रस्ता निवळकर यांच्या कंपाऊंडला लागून कोणीतरी अज्ञाताने पुन्हा दगडी चिरे लावून अडविला. या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









