Sunday, November 8, 2026
spot_img
Home चिपळूण दुचाकी अपघातात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

दुचाकी अपघातात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

चिपळुणातील पिंपळी येथे घडली घटना, ऐन दिवाळीत काळाचा घाला

चिपळूण:- तालुक्यातील गजमल पिंपळी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात शासकीय कर्मचारी तसेच माजी कबड्डीपटू अशोक कृष्णा राणे (५५, कोळकेवाडी) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन दिवाळी सणात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातील संजय श्रीकांत पवार (४५, नांदिवसे) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अशोक राणे व संजय पवार हे दोघे त्यांच्या ताब्यातील दुचाकीने प्रवास करत होते. असे असताना दोन्ही दुचाकीस्वार तालुक्यातील गजमल पिंपळी येथे आले असता एकमेकांना धडकले. या अपघातात अशोक राणे हे गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले. तर संजय पवार हाही जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

घटनास्थळी तात्काळ नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मृत अशोक राणे हे जलसंपदा विभागात कार्यरत होते. याशिवाय कोळकेवाडी येथील राधाकृष्ण क्रीडा मंडळ व वाघजाई क्रीडामंडळाचे ते ज्येष्ठ कबड्डीपटू होते. या अपघाताची माहिती अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यास समजल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अवारे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.आर नलावडे, मनोज कुळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कामथे रुग्णालयात विच्छेदनानंतर राणे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.