मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील भिंगळोली आदिवासीवाडी येथे एका विवाहित महिलेने दारूच्या नशेत राहत्या घरी लोखंडी भालास नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक २३ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत महिलेचे पती हरिश्चंद्र शंकर जाधव हे घराच्या परिसरात आलेला एक साप हाकलण्यासाठी घराबाहेर गेले होते. यादरम्यान, त्यांची पत्नी सौ. अर्चना हरिश्चंद्र जाधव हिने दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलले. तिने घरातील एका लोखंडी भालास नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून आत्महत्या केली.
पती साप हाकलून काही वेळात परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी २४ जुलै रोजी सकाळी १०:१९ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ.क्र. १४/२०२६) करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









