खेड:- खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे दहा जणांच्या टोळक्याने घरात घुसत पती आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीची ही घटना 7 जून रोजी सकाळी दहा वाजता घडली. खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत 21 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिमा सुरेश दरेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार चंद्रकांत नारायण , उज्वला दरेकर चंद्रकांत दरेकर, मनिष चंद्रकांत दरेकर. राजेश्री राजेश दरेकर. रघुनाथ मोरे (पूर्ण नाव माहीत नाही), उर्मिला रघुनाथ मोरे (सर्व रा. कशेडी सुतारवाडी ता. खेड, जि. रत्नागिरी), यांच्यासह विक्रांत चंद्रकांत दरेकर, प्राची विक्रांत दरेकर, तेजस मुकेश दरेकर (सर्व मुळ रा. कशेडी सुतारवाडी सध्या रा. मुंबई ता. खेड आणि सुप्रिया प्रशांत पाटील (मुळ रा. कशेडी सुतारवाडी जि. रत्नागिरी, सध्या रा. खेड ता. खेड जि, रत्नागिरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी व त्यांचे पती घरी घरगुती काम करीत असताना आरोपी १ ते १० असे फिर्यादी यांचे घरी लाठ्या काठ्या, पाईप , दगड, कोयती, घेवुन फिर्यादी व त्यांचे पती यांना मारण्याचे उद्देशाने अंगावर धावत आले. तसेच फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन त्यांचा मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.









