Sunday, May 24, 2026
spot_img
Home चिपळूण तोंडली येथे भरारी पथकाने जप्त केले ६८ हजार रुपये

तोंडली येथे भरारी पथकाने जप्त केले ६८ हजार रुपये

चिपळूण:- तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना तोंडली येथे भरारी पथकाने ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.

तोंडली येथे एका घरात पैसे वाटप होत असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भरारी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या कारवाईदरम्यान सुभाष जाधव यांच्याकडे १८ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. तसेच त्याच ठिकाणी आणखी ५० हजार रुपये सापडले. मात्र ही ५० हजार रुपयांची रक्कम नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. भरारी पथकाने तोंडली येथे ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे.