Thursday, August 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी तेली आळी येथे तरुणाला दगड मारुन दुखापत करणाऱ्याविरुध्द गुन्हा

तेली आळी येथे तरुणाला दगड मारुन दुखापत करणाऱ्याविरुध्द गुन्हा

रत्नागिरी:-  शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घराच्या गॅलरीत अभ्यास करणाऱ्या एका तरुणावर राग धरून दगडफेक केल्याची आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी कृणाल कृष्णकांत जावकर (वय २१ वर्षे, मूळ रा. जावकरवाडी, विजयदुर्ग, सध्या रा. तेली आळी, आठवडा बाजार) हे राहत असलेल्या घराच्या गॅलरीमध्ये बसून अभ्यास करत होते. त्यावेळी त्यांच्याच घरासमोर राहणाऱ्या आरोपी कारकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तेली आळी, आठवडा बाजार, ता. जि. रत्नागिरी) याने कोणतेही कारण नसताना फिर्यादीला दुखापत होईल या उद्देशाने त्यांच्या दिशेने दगड फेकून मारला. हा दगड फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाला लागल्याने त्यांना मुका मार लागला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तसेच त्यांच्या आत्याला व काकांना अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ केली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३:४७ वाजता रत्नागिरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५(अ) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.