Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी टीआरपीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला मिऱ्या समुद्रकिनारी

टीआरपीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला मिऱ्या समुद्रकिनारी

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्याबंदर समुद्रकिनारी प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली. यावेळी हा मृतदेह बेपत्ता असलेले सुधाकर मधुकर रसाळ (५२, रा. टीआरपी पांडवनगगर, रत्नागिरी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

सुधाकर हे २३ मे २०२५ रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. यासंबंधी नातेवाईकांनी रत्नागिरी शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची खबर दाखल केली होती. सुधाकर यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यासबंधी रत्नागिरी शहर पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.