Wednesday, August 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेची इमारत रंगवताना कामगार पडून जखमी

रत्नागिरी नगर परिषदेची इमारत रंगवताना कामगार पडून जखमी

रत्नागिरी:- येथील नगर परिषद येथे रंगकाम करणारा कामगार पडून जखमी झाला. तेथील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद राजभर (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) असे जखमी कामगाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नगरपरिषद इमारत येथे घडली.

रत्नागिरी नगर परिषदेच्या इमारतीचे रंगकाम करण्यात येत आहे. त्यासाठी गोविंद राजभर हा आपल्या सहकाऱ्यांसह काम करत होता. सायंकाळी रंगकाम करत असताना गोविंद हा पडून जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तेथील त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.