Friday, October 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी झारणीरोड येथे विसर्जन मिरवणुकीत बाटली फेकल्याप्रकरणी संशयित ताब्यात

झारणीरोड येथे विसर्जन मिरवणुकीत बाटली फेकल्याप्रकरणी संशयित ताब्यात

रत्नागिरी:- शहरातील झारणीरोड येथे घरगुती मिरवणुकीदरम्यान बाटली फेकल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली आहे. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सागर चक्रधर दळी (४५, रा. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनंत चतुदर्शीच्या निमित्ताने गणपती विसर्जन करण्यात येत होते.

शहरातील झारणीरोड येथे अशाच प्रकारे एक घरगुती गणपती विर्सन मिरवणुक वाजत-गाजत जात होती. यावेळी एक बाटली मिरवणुकी जाणाऱ्या दिशेने आली. दरम्यान या प्रकाराने एकच खळबळ उडाली. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाणार अशी शक्यता तयार झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.