Tuesday, May 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूणमध्ये महावितरणच्या ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

चिपळूणमध्ये महावितरणच्या ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या मालकीच्या ३३ केव्ही विद्युत वाहक तारांची चोरी झाली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२५ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने कटरने तार कापून एकूण ९० हजार रुपये किंमतीच्या तारा चोरून नेल्या.

याबाबत सुजित चंद्रकांत शिंदे (वय ३१, सध्या रा. राधाकृष्ण नगर, बहादुरशख नाका, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, चोरट्याने ८० स्क्वेअर एम. एम. ए. सी. एस. आर. प्रकारची सुमारे १०८० मीटर लांबीची तार चोरली, ज्यामध्ये बाहेरच्या बाजूला ॲल्युमिनियम आणि आत स्टीलची तार होती. या चोरीमुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.