कोंडगाव येथे बंद बंगला फोडून सहा लाखाची चोरी

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील अजय परशुराम पांचाळ(वय ४३) यांचा बंद बंगला फोडून रोख रक्कम व दागिने असे सहा लाख चौतीस हजार रुपयेची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

अजय परशुराम पांचाळ हे आज सकाळी मुबंईवरून गावी आले असता घरात प्रवेश केला असता घरातील सामान असताव्यस्त पडलेले व पाठीमागील दरवाजा उघडा दिसल्याने व आतील कपाट फोडलेले दिसल्याने घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतची कल्पना साखरपा पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

श्री पांचाळ हे १७ ऑक्टोबरला घर बंद करून मुबंईला गेले होते. शुक्रवारी सकाळी मुबंईवरून ते गावी आले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अजय यांनी साखरपा पोलिसांना याबाबतची कल्पना दिली असता त्वरित साखरपा पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कार्यवाही सुरु केली आहे.

यावेळी श्वान पथक, ठसे तज्ञ फॉरेन्सिक यांना पाचरण करण्यात आले होते. यावेळी डीवायएसपी सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या असून चोरीचा छडा लावण्यासाठी साखरपा पोलीस वरिष्टांच्या मार्गदर्शना खाली तपास करीत आहेत.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे सहाय्य्क पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस मनस्वी पावसकर आदिनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे करीत आहेत.