Thursday, September 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी काजरघाटी गांजा प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

काजरघाटी गांजा प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी तिठा येथे मंगळवारी सायंकाळी 4 वा. सुमारास तब्बल 2 किलो 174 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड.निलांजन नाचणकर यांनी काम पाहिले.

इम्रान मोहम्मद काझी (रा.गवळीवाडा,रत्‍नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शहर पाेलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्‍याच्याकडून 1 लाख 8 हजार 700 रुपयांचा तब्बल 2 किलो 174ग्रॅम गांजा, 80 हजारांची दुचाकी आणि 200 रुपयांची पिशवी असा एकूण 1 लाख 88 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

मंगळवारी सायंकाळी गुन्हे प्रकटीकरणचे पथक कारजघाटी तिठा परिसरातून गस्त करत असताना त्‍यांना एक संशयित शाईन दुचाकी (एमएच-08-बीबी-6736) दुचाकीवरुन संशयितरित्‍या फिरताना दिसून आला. या पथकाने त्‍याला थांबवून त्‍याची चौकशी व झडती घेतली असता त्‍याच्याकडून गांजा हा अमली पदार्थ मिळून आला होता.