रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे चालवून टेम्पो ट्रॅव्हल्सच्या दरवाज्याजवळ ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत तुकाराम गोरे (रा. वळके, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास हातखंबा तिठा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो ट्रव्हल्स चालक प्रमोद सखाराम राऊळ (वय ३३, आंब्रड कनकपालवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) हे टेम्पो ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-०१ सी आर ९३०३) मधून नातेवाईकांना घेऊन ठाणे येथे होते. गोवा ते मुंबई महामार्गावरुन घेऊन जात असताना हातखंबा गाव येथे आले असताना रत्नागिरीच्या दिशेकडून येणारी दुचाकी (एमएच-०८ एयु ६३५४) वरिली चालक संशयित याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून टेम्पोच्या दरवाजावर ठोकर देवून अपघात केला. यामध्ये स्वार स्वतःजखमी झाले त्यांच्या मागे बसलेले संदेश सुर्यकांत पेडणेकर (वय २८, रा. खानू शिंदेवाडी, रत्नागिरी) यांच्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









