हद्दपार केलेला आरोपी पुन्हा चिपळुणात

चिपळूण:- येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्य आदेशानुसार हद्दपार केलेला आरोपी पुन्हा चिपळूण हद्दीत दिसून आला.  त्याच्या विरुद्ध पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. जुएब जमील सय्यद (२६, रा. गोवळकोट रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

जुएब सय्यद याच्यावर आतापर्यंत पाचहून अधिक गुन्हे दाखल असल्याने त्याला येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते; मात्र या आदेशाचे उल्लंघन करत तो चिपळूण हद्दीत वावरताना आढळून आला. याबाबत पोलिस हवालदार समिधा सुहास पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.