स्वप्नाली सावंत यांच्या मृतदेहाचे अवशेष समुद्रातून शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान 

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.स्वप्नाली सावंत यांची क्रुरपद्धतीने निघृण हत्या पतीनेच केल्याचे उघड झाले आहे. दि.१ सप्टेंबरच्या दुपारी हत्या केल्यानंतर रात्री मृतदेह जाUण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर राखेसह हाडे एकत्र करुन पुरावा नष्ट करण्यासाठी ती समुद्रात फेकून दिली. त्यामुळे आता मृतदेहाचे अवषेश शोधण्याचे आव्हान शहर पोलीसांसमोर उभे राहिले आहे. सोमवारी पुन्हा शहर पोलीसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला आहे.

गणेशोत्सवासाठी मिर्या येथील आपल्या मुळघरात आलेल्या सौ.स्वप्नाली सावंत यांचा दोन वर्षांच्या पुर्ववैमनस्यांतून पती सुकांत सावंत यानेच हत्या केल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर सुकांत सावंतसह त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा चुलत भावासह कामागाराला पोलीसांनी अटक केली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार सुकांत सावंत याने दि. १ सप्टेंबरला दुपारी स्वप्नाली सावंत यांची हत्या केली. दिवसभर मृतदेह घरातील मागच्या बाजूला ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने चुलत भाऊ छोटा भाई व कामगाराला बोलावले. त्यानंतर तिघांनी रात्री घराच्या आवाराताच मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथील राख, हाडे समुद्रात फेकून देण्यात आल्याचेही पोलीसांच्या तपासात स्पष्ट झाले  आहे.

स्वप्नाली सावंत यांची हत्या झाल्याने त्याच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे मोठे आव्हान शहर पोलीसांसमोर आहे. तर पती सुकांत सावंत याने किती दिवसांपुर्वी स्वप्नाली सावंत यांना मारण्यासाठी कट रचला होता. गणेशोत्सवाचाच कालावधी त्याने हत्येसाठी का निवडला होता. हे शोधण्याचे आव्हन शहर पोलीसांसमोर उभे राहिले आहे.