स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; निनावी पत्रामुळे पोलिसांना मोठी मदत

रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित मुख्य आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना वर्षानंतर यश आले. एका निनावी पत्राने याची भांडाफोड झाली. गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुपच्या कप्प्यात मोबाईल सापडला. याचा सीडीआर काढुन ज्यांना कॉल झाले आहेत, त्यांची चौकशी करून खुनाच्या गुन्ह्यात सामिल असल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

या खुन प्रकरणी एक एक माहिती पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे. मात्र संशय़ितांना ते अडचणीचे ठरणार आहे. स्वप्नाली सावंत खून प्रकरणी पोलिसांनी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांच्या डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांस आणि दाताचा डीएनए जुळला असल्याने तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु स्वप्नाली सावंत खुन प्रकरणातील मोबाईल पोलिसांना सापडत नव्हता. पोलिस वर्षे झाले त्या मोबाईलच्या शोधात होते. तो पोलिस तपास करीत असताना विहिरीत सापडला होता. परंतु त्यामध्ये अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. परंतु एका निनावी पत्राने पोलिसांचे हे काम सोपे केले. हा मोबाईल भाई सावंत यांच्या गाडीच्या सनरुपच्या कप्प्यामध्ये असल्याचे पत्रात म्हटले होते. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे. खुनादरम्यान स्वप्नाली सावंतच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढुन मोबाईल विहिरीत टाकला होता. त्यानंतर मुख्य संशय़ित आरोपी भाई सावंत यांनी नवीन मोबाईल घेऊन तो गाडीच्य सनरुपमध्ये लपवून ठेवला होता. त्यामुळे स्वप्नाली सावंत हिचे लोकेशन हरचिरी, लांजा या दरम्यान दाखवले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य संशय़िताने हा कट रचला होता. या मोबाईलमधील सीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला जाणार आहे. त्या दरम्याने ज्यांचे ज्याचे कॉल झाले आहेत किंवा आले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्यापैकी कोण सामिल असल्याचे तपासात निष्पन्न झाले तर त्यालाही आरोपी करून पुरवणी दोषारोप पत्र दिले जाणार आहे. पोलिसांनी यापूर्वीच यातील मुख्य संशयित आरोपी सुकांत गजानन सावंत, रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद गावणंग याना अटक केली आहे. खुन केल्यानंतर स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह जाळुन त्याची राख गोणपाटात भरुन टाकली जात होती. बहुतांशी राख समुद्रात टाकली. परंतु थकल्यानतंर संशय़ितांनी उर्वरित राख घराच्या बाजूला टाकली होती. त्यामध्ये पोलिसांना स्वप्नाली सावंत हीचे जोडवे, मांस आणि दात सापडला होता.