Saturday, May 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी साळवी स्टॉप येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

साळवी स्टॉप येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील स्टेट बॅंक कॉलनी जवळलील अंतर्गत रस्त्यावर वळण घेऊन निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर कृष्णा जाधव (वय ५४, रा. गावखडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साळवी स्टॉप ते परटवणे जाणाऱ्या रस्त्यावरील स्टेट बॅंक कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे टेम्पो (क्र. एमएच-०८ डब्ल्यू १८२१) घेऊन जात असताना निष्काळजी पणे चालवून दुचाकी (क्र. एमएच-०८ एव्ही १८८२) या दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात अविनाश अरुण गांगरकर (वय २५, रा. असुर्डे, ता. लांजा) व मयंक संदेश गांगरकर (वय ८, रा. अदिनाथनगर, टीआरपी, रत्नागिरी) यांच्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.