संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडीतील पडक्या विहीरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

संगमेश्वर:-तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सितारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहीरीत बिबट्या मृतावस्थेत सापडला असून याची खबर वनविभागाला देण्यात आली आहे.

गेली दोन दिवस परिसरात कुजकट वास येत होता मात्र एखादा ऊंदीर वा घुस कुजली असावी असे वाटल्याने नेवरेकर यांच्या घरच्या लोकानी दुर्लक्ष केले, मात्र आज वास जास्तच येत असल्याने नेवरेकर यांनी पडक्या विहीरीत डोकावून पाहीले असता एक प्राणी कुजलेल्या अवस्थेत दिसुन आला. अधिक लक्ष देऊन पाहीले असता तो प्राणी बिबट्या असल्याचे लक्षात येताच नेवरेकर यांनी येथील सामजिक कार्यकर्ते व ग्राप सदस्य राजु पाटील यांना कळवले ,पाटील यांनी घटना स्थळी जावून प्रत्यक्ष पहाणी केली असता तो मृत प्राणी बिबट्याच असल्याने पाटील यांनी वन विभागाशी संपर्क साधुन सविस्तर माहीती वन विभागाला कळवली आहे .

बिबट्या कदाचित भक्षाचा पाठलाग करत असता विहीरीत पडला असावा व विहीर खोल असल्याने त्याला वर येता आले नसल्याने त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज स्थानिक वर्तवित आहेत.
नेवरेकर यांच्या विहीरीत बिबट्या पडला असल्याचे समजताच त्याला पाहण्या साठी ग्रामस्थानी गर्दी केली आहे .

▶️