रत्नागिरी:- शहरातील एमआयडी- मिरजोळे- येथील शो-रुमच्या दर्शनी दरवाजाचे कूलप उचकटून अज्ञात चोरट्याने ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ८) ते मंगळवारी (ता. ९) सकाळी नऊच्या सुमारास एस. पी. ऑटो हब टाटा मोटर्स, प्लॉट नं ३१/१ व जागृत मोटर्स प्रा. लि. एमआयडीसी, मिरजोळे-रत्नागिरी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुण अशोक देशपांडे ( रा. एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी ) हे काम करत असलेल्या टाटा मोटर्स या शोरुमच्या दर्शनी काचेच्या दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून, शोरुममध्ये प्रवेश करुन कॅशीअर केबीनचे ड्राव्हर मधील रोख रक्कम तसेच मारुती जागृती मोटर्स एमआयडीसी – मिरजोळे येथील ईमारतीचे स्लायडिंग खिडकी उघडून शोरुममध्ये प्रवेश करुन १ लॅपटॉप व मोबाईल, तसेच रोख रक्कम असा ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी अरुण देशपांडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









