Thursday, June 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी शीळ धरणाने गाठला तळ; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईचे संकट

शीळ धरणाने गाठला तळ; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईचे संकट

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) कमी झाला आहे. कडक ऊन आणि पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरातील पाणी नियोजनात मोठे बदल करण्यात आले आहेत. धरणातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने खाली आल्यामुळे आता केवळ आगामी २० ते २५ दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारचा पाणीपुरवठा अजूनही बंदच

शीळ धरणातील खालावलेली पाणीपातळी पाहता प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. धरणात पुरेसा साठा नसल्याने शहराचा दर सोमवारचा पाणीपुरवठा अजूनही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. आगामी काळात तालुक्यात आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतरच सोमवारचा नियमित पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू केला जाऊ शकणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता पाण्याचा वापर मोठा आहे. सध्या रत्नागिरी शहरात सुमारे १२ हजार अधिकृत नळ जोडण्या आहेत. या नळ जोडण्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराला दररोज सुमारे २० दशलक्ष लिटर इतका प्रतिदिन पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे धरणातील साठा कमी होणे हे संपूर्ण शहरवासीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जून रोजी शीळ धरणात केवळ ०.५८ दशलक्ष घ.मी. इतकाच पाणीसाठा उरला होता. त्यावेळी प्रशासनाकडून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन अंतिम केले जात होते. परंतु, सुदैवाने ८ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा काहीसा वाढून ०.४८७ दशलक्ष घ.मी. वर पोहोचला. परिणामी, प्रशासनाने एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजित संकट तूर्तास थांबवले होते.

८ जूनच्या सुरुवातीच्या पावसानंतर हवामानात अचानक बदल झाला. पावसाने पुन्हा एकदा जोर धरला नसल्याने आणि त्यातच कडक ऊन पडू लागल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले व साठा वेगाने कमी होत गेला. गेल्या मंगळवारी जो साठा ०.४८७ दशलक्ष घ.मी. होता, तो आता थेट ०.४५० दशलक्ष घ.मी. इतका खाली आला आहे. हा साठा केवळ पुढील २० ते २५ दिवसच पुरू शकणार असल्याने आता सर्वांचे जे पुन्हा एकदा दमदार पावसाकडे लागले आहे.