रत्नागिरी:- तालुक्यातील पाली नजिकच्या एका गावातील प्राथमिक शाळेत पहिलीतील चिमुरड्या मुलींशी अश्लिल चाळे करणार्या शिक्षकाला ग्रामीण पोलीसांनी शनिवारी रात्री अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी 1 दिवसाच्या पोलिस कोठडीत केली.रमेश जाधव (50, रा.संगमेश्वर,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
15 वर्षांपूर्वीही त्याने असे कृत्य केले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.यातून धडा न घेता त्या शिक्षकाने पुन्हा आपले प्रताप सुरु केल्यावर पालकांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रार दिल्यावर ग्रामीण पोलिसांनी शिक्षकाला शनिवारी रात्री अटक करुन रविवारी न्यायालया समोर हजर केले.न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.