शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताला जामीन

रत्नागिरी:- शहरानजीकच्या परिसरातील १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मोहसीन दस्तगिर नदाफ (१९, रा. एकतानगर खेडशी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. मोहसीन याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती.

नदाफ हा १६ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता, अशी तक्रार मुलीच्या वडिलांकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल केली होती. ५ जुलै २०२५ रोजी पीडित मुलीचे वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता आरोपी हा कार वेगाने चालवत त्या ठिकाणाहून निघून गेला. यावेळी त्याने अन्य काही गाड्यांचे नुकसान केले, असाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. पोलिसांकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर आरोपीने न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले.