चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये सुरु होता प्रकार
चिपळूण:- शहरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेस चिपळूण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीने धाड टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी त्या महिलेस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर हा वेश्या व्यवसाय सुरु होता. या महिलेने मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसासाठी आणले होते. तिच्याकडून व्यवसाय करवून घेतला जात होता.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरीच्या पथकास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. याप्रकरणी त्या महिलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.









