गुहागर:- तालुक्यातील विनयभंगप्रकरणी संशयित विजय सकपाळ यांना पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
विनयभंगप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेवर झालेल्या प्रकाराची योग्य ती दखल न घेता संशयिताला पाठीशी घातल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना जाब विचारला होता.
संशयिताला सुटणारी कलमे लावून त्याला पाठीशी घातले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या अॅड. सायली दळवी यांनी केला होता. तसेच अन्य कलमेही लावण्याची मागणी त्यांनी केली होते. त्यानंतर पोलिसांकडून विजय सकपाळ यांना अटक करण्यात आली.