चिपळूण:- विजेचा धक्का लागून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास श्रीराम कदम (वय ५०, रा. ताम्हाणमाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विलास कदम यांना विजेचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.









