Sunday, May 24, 2026
spot_img
Home चिपळूण वाशिष्ठी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

वाशिष्ठी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- शहरातील पेठमाप येथील रहिवासी व नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला १७ वर्षीय बिलाल मुश्ताक पोटे याचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

याबाबतची खबर गफूर अहमद पोटे (४२, पेठमाप) यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, बिलाल हा शुक्रवारी सायंकाळी नदीपात्रानजीक त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तोल गेल्याने तो नदीत पडला आणि बुडू लागला. मित्रांनी त्याला नदीबाहेर काढले. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, बिलाल हा नुकताच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यापुढील शिक्षण घेऊन भविष्य घडवण्याची त्याची तयारी सुरू होती. अशावेळी काळाने त्याच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे वडील नोकरीनिमित्त परदेशात असतात. शनिवारी बिलालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिपळूण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.