रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे वारीसाठी आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञाताने लांबवली.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना रविवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वा.कालावधीत घडली आहे.
उल्हास दत्ताराम जाधव (28,रा.आरोग्य मंदिर,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,रविवारी सकाळी उल्हास आपल्या ताब्यातील शाईन दुचाकी (एमएच- 08-एएफ- 5747) घेउन नाणीज येथे वारीला गेला होता. त्याने आपली दुचाकी जुना मठ ते शिवगणवाडीत जाणार्या अंतर्गत रस्त्याच्या डाव्या बाजुला पार्क केली होती. वारीला जाउन आल्यानंतर दुपारी 3 वा.उल्हास आपली दुचाकी घेण्यासाठी गेला असता त्याठिकाणी त्याला आपली दुचाकी मिळून आली नाही.त्याने आजुबाजुला शोध घेतला परंतू दुचाकी न मिळाल्याने त्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.









