वाटद-खंडाळा येथे मद्यधुंद अवस्थेतील तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा जाणाऱ्या रस्त्यावर दारुच्या मद्यधुंद अवस्थेत तरुण आढळला. जयगड पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधेश विजय राजभर ( वय २९, रा. उंडी, मुळ ः उत्तर प्रदेश) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाटद-खंडाळा रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण दारुच्या मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.