वरचीआळी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी सांबरे हॉस्पिटलला दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पंकज सुरेश भाताडे (वय ३५, रा. सुभाष रोड, वरची आळी, गणेशमंदिर समोर रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास सांबरे हॉस्पिटल येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकज याला गेल्या एक वर्षापासून पायात गुठळ्या होण्याचा त्रास होता. बुधवारी त्याला सकाळी दहा वाजता श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ त्याला सांबेर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.