रत्नागिरी:- बिबट्याचे कातडे ज्याच्याकडुन घेतले, तो मुख्य सुत्रधार वन विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडुन सांबर या वन्य प्राण्याची दोन शिंगे व कवटी आढळून आली आहे.
वन्य प्राण्यांच्या तस्करीबाबत त्याला विन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडुन आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे वन विभागाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अजित चंद्रकांत नातु (वय ४८. रा. धाकोरा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे या प्रकरणाती चौथ्या संशयित आरोपीचे नाव आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ अन्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. २०) रात्री साडेनऊ वाजता मुंबई गोवा महामार्गावरील कोदवली (ता. राजापूर) येथील पेट्रोल पंपवरती दोन दुचाकी स्वारांच्या संशयास्पद हालचालीवरून वनविभागाने त्यांना पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता बॅगेमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याची कातडी आढळून आली. वन्य प्राण्याच्यातस्करी बाबत जयेश बाबी परब , दर्शन दयानंद गडेकर, दत्तप्रसाद राजेंद्र नाईक ( सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन बिबट्या प्राण्याची कातडी जप्त केली. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला. दोन दुचाकी जप्तकरुन अटक केली.
संशयितांची वन विभागामार्फत कसुन चौकशी केली. बिबटयाची कातडी कोणाकडून घेतली, याची विचारणा केली असता,अजित चंद्रकांत नातु ( रा. धाकोरा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ) यांचे नाव सांगितले. त्यानुसार वन विभागाने काल दुपारी चार वाजता पिठाच्या गिरणीवर काम करणा-या संशयित अजित नातु याला ताब्यात घेतले. वरील तिघांना या संशयितानेच बिबट्याची कातडी दिल्याचे कबुल केले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे अजित नातु यांच्याकडे सांबर या वन्य प्राण्याची दोन शिंगे व कवटी आढळून आली.
वन्य प्राण्याच्या तस्करी बाबत संशयित आरोपीला वन विभागाने ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखलकरून अटक केली. त्याला राजापूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची वन कोठडी सुनावली ही कारवाई रत्नागिरी परिक्षेत्रवन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल राजापूर, स.व.घाटगे, वनपाल संगमेश्वर तौ.र.मुल्ला, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले सागरपताडे, वनरक्षक साखरपा, न्हा.नु.गावडे,वनरक्षक आरवली आकाश तुकाराम कडूकर, वनरक्षक लांजा विक्रम कुंभार, संजय रणधिर, राहूल गुंठे, सुरज तेली आदींनी कारवाई केली.