Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजात जमिनीच्या वादातून लोखंडी अवजाराने मारहाण

लांजात जमिनीच्या वादातून लोखंडी अवजाराने मारहाण

लांजा:- तालुक्यातील हर्चे देऊळवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका आरोपीने लोखंडी अवजाराने फिर्यादीच्या गुप्तांगावर वार करून त्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना १ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी ३ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद गोपाळ शेलार (४८, रा. हर्चे देऊळवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद शेलार यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या घरातील हॉलमध्ये उभे असताना आरोपी सुनील अशोक शेलार याने जमिनीच्या वादातून सुनील शेलार त्यांच्यावर रागावले होते. याच रागातून, फिर्यादी विनोद शेलार खुर्ची घेत असताना झालेल्या आवाजाच्या कारणावरून सुनील शेलार यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

याचवेळी आरोपी दोन संशयित महिलांनी विनोद शेलार यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करत असताना आरोपी सुनील शेलार याने कोणत्यातरी लोखंडी अवजाराने विनोद शेलार यांच्या गुप्तांगावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. एवढेच नाही तर, सुनील शेलार यांनी फिर्यादीला ठार मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे हर्चे देऊळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.