Friday, May 1, 2026
spot_img
Home संगमेश्वर रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

उक्षी-संगमेश्वर दरम्यानची घटना

संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. साखळकोंड येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सकाळी या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ फेब्रुवारी) रात्री ९:०० ते शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. उक्षी व संगमेश्वर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या साखळकोंड येथील पोल नं. १७५/२६ जवळ हा अपघात घडला.
धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे या अनोळखी व्यक्तीला शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलीस (जीआरपी) कर्मचारी रोहित मधुकर मोहिते यांनी या घटनेची खबर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. लोहमार्ग पोलीस आता मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. जर कोणाला या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.