रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात येथील प्रवासी संगमेश्वर प्लॅटफार्मवर जवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मनदोरा रमेश देवजी (वय ४८, रा. जामनगर, गुजरात) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी पावणे नऊच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरात ते गोवा असे प्रवास करत होते. संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे ते रेल्वेतून पडले. तात्काळ रेल्वे पोलिसांनी त्यांना रत्नागिरीत आणून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी (ता. २०) सकाळी पावणेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









