Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रिक्षा चालकाने आपल्याच मुलाच्या मनगटावर केला वार

रिक्षा चालकाने आपल्याच मुलाच्या मनगटावर केला वार

रत्नागिरी:- रिक्षात बसलेल्या लहान मुलाच्या हाताच्या मनगटावर चाकूने वार करुन पळ काढणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उदय यादव (वय ३६, रा. निवे बुद्रक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे मुलाच्या मनगटावर वार करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) रात्री साडेनऊच्या सुमारास कुवारबाव रेल्वे स्टेशनफाटा येथील माने पेट्रोल पंपासमोरिल पानटपरी जवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महेश यादव याने आपल्या मुलगा देज याला शांतीनगर येथून रिक्षा (क्र. एमएच-०८ ए क्यू ३३४६) मधून घेवून मारुती मंदिर खाऊगल्ली येथे घेवून गेला होता. मुलाला सॅण्डवीज व आयस्क्रीम खायला देवून पुन्हा घरी येत असतान त्याला महालक्ष्मी खेडशी येथील भाडे मिळाले ते भाडे घेऊन खेडशीत सोडून येत असताना त्यांच्या पत्नीचा फोन आला त्यांचे फोनवर वाद झाला. त्याचा राग येवून कुवारबाव रेल्वे फाटा येथील माने पेट्रोल पंपासमोरील पान टपरी येथे रिक्षा थांबुवन पत्नी सोबत झालेल्या रागाने रिक्षात बसलेल्या आपल्या मुलगा तेज महेश यादव (वय ८, रा. आजोळी केळवली, वरचीवाडी, लांजा) याच्या हाताच्या मनगटावर चाकू मारुन दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी उमेश उदय यादव (वय ३७, रा. सावंतनगर, शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.