रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राम नाका येथे कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत.
दुचाकीवरील जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता पण पोलिसांनी परिस्थिती हाताळून पंचनामा सुरू केला आहे.









